logo

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव पंचायत समितीचे विस्तार अधिकारी करतात रविवारी सुध्दा काम


महाराष्ट्र शासनाने सोमवार ते शुक्रवार असा पाच दिवसाचा आठवडा केला असला तरी सातारा जिल्ह्यातील कोरेगाव पंचायत समितीचे कामकाज रविवारी म्हणजे सुट्टीच्या दिवशीही सुरू असते .याबद्दल पंचायत समिती व अधिकारी आणि कर्मचारी यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि पिंपोडे बु ।। ,ता.कोरेगाव येथील माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे सातारा जिल्हा अध्यक्ष जावेद आत्तार यांनी माहितीच्या  अधिकारात  सरपंच यांच्या अतिक्रमणाची माहिती मागितली होती. सदरची माहिती योग्य मुदतीत मिळाली नाही म्हणून जावेद आत्तार यांनी अपिलीय अधिकारी तथा विस्तार अधिकारी ,पंचायत समिती कोरेगावचे लालासाहेब गाढवे यांच्याकडे अपिल दाखल केले होते.
अपिलीय अधिकारी लालासाहेब गाढवे यांनी या अपिलाची सुनावणी रविवारी दि.१८ जुलै २०२१ रोजी दुपारी तीन वाजता व दुसऱ्या अर्जावर चार वाजता ठेवली होती. महाराष्ट्र शासनाने कामकाजाचा आठवडा हा पाच दिवसाचाच केलेला आहे. सोमवार ते शुक्रवार या दिवशीच शासकीय कामकाज चालते.शनिवारी व रविवारी सुट्टी असते हे माहिती असूनही कर्तव्यदक्ष विस्तार अधिकारी लालासाहेब गाढवे यांनी मुद्दाम अपिलाची सुनावणी  रविवारी घेतली.
यापूर्वी सुद्धा असे किस्से घडले आहेत. तक्रारदार यास पत्र पाठवताना यामध्ये मुद्दाम चुकीची तारीख टाकणे ,किंवा सुनावणीच्या अगोदरची तारीख टाकणे ,कधी कधी तारीखच न लिहिणे असे प्रकार घडले आहेत. आज घडलेला प्रकार म्हणजे तक्रारदार जावेद आत्तार यांना मुद्दाम मानसिक व शारिरीक त्रास देण्यासाठी केलेला खटाटोप आहे.
शनिवारी किंवा रविवारी महाराष्ट्र राज्यात अशी कोणतीही पंचायत समिती नसेल कि त्यांचे कामकाज सुट्टीच्या दिवशीही सुरू असेल. सुट्टीच्या दिवशी कामकाज करणाऱ्या कर्तबगार ,कर्तव्यदक्ष अशा विस्तार अधिकारी यांना आदर्श गुणवंत पुरस्कार देऊन गौरविण्यात आले पाहिजे. असे अधिकारी महाराष्ट्रात असतील तर नक्कीच सर्वात पुढे महाराष्ट्र माझा अभिमानाने म्हणावे लागेल.

6
14752 views